राखी घेणार तिच्या नवऱ्यापासून घटस्फोट; बिग बॉसमध्ये केला मोठा दावा

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 6 जानेवारी 2021 :-बिग बॉस शो सतत कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेत राहत असतो.कलर्स वाहिनीवर हा बिग बॉस नावाचा शो दाखवला जातो.

सध्या हा शो चर्चेत आलाय तो राखी सावंत हिच्यामुळे. बिग बॉसच्या १४ व्या सीझनमध्ये त्यांनी याबाबतीतील अनेक खुलासे केले आहेत.

राखी या वेळी तिचा नवरा रितेश सोबत बोलताना दिसून आली. तिच्या नवऱ्यासोबत बोलतानाही तिची व्हिडीओ व्हायरल झाली आहे.

यामध्ये राखी नवरा रितेशकडून तलाकसाठी मागणी करत आहे. राखी आपल्या नवऱ्याशी बोलताना दिसून आली.राखी तिच्या नवऱ्याशी बोलताना म्हणते,’तुला तलाक द्यायचा आहे तर जा.

मी तुला घाबरत नाही. दीड वर्ष तो इथे आला नाहीस.’हे सगळे ऐकून तिथे उपस्थित असलेले अभिनव,सोनाली फोगाट आणि रुबिना हैराण होतात.

त्यानंतर अभिनव तिला नवऱ्याबद्दल विचारतो तेव्हा ती तिच्या लग्नाची गोष्ट सांगते. राखी सांगते की, सर्व नवऱ्यांना जेव्हा मी पाहते तेव्हा मला कसेतरी होऊ लागते.

मग मी का रुबिनाच्या नवऱ्याला चोरू?यापूर्वीही तिने यासंदर्भातील तीच मत व्यक्त केले आहे.अभिनव आणि रुबिना हे तिच्या आवडत्या कप्लपैकी एक आहे. त्यामुळे ती त्यांच्यासोबत भांडत नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment