पालिकेच्या अनागोंदी कारभाराबाबत महिला नगरसेविका सत्याग्रह करणार

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 7 जानेवारी 2021 :- पालिका प्रशासनावर पदाधिकाऱ्यांचा अंकुश नाही. अनेक कर्मचारी व ठेकेदार अधिकाऱ्यांना जुमानत नाही. ठरावीक ठेकेदार पालिका चालवतात.यामुळे शहरवासियांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

मात्र तरी देखील पालिकेच्या कारभारात कुठलीही सुधारणा होत नसल्याच्या निषेधार्थ नगरसेविका संगीता गटाणी यांनी शुक्रवारी (८ जानेवारी) पालिका कार्यालयात बैठा सत्याग्रहाचा निर्णय घेतला.

शहरातील काही भागात सुमारे दोन वर्षापासून अस्वच्छ व अनियमित पाणी पुरवठा होत आहे. शहराच्या मुख्य मार्गासह,वाडी-वस्ती व काही भागातील विद्युत दिवे अनेक महिन्यापासून बंद आहेत.

यामुळे नागरीकांना दसरा-दिवाळी देखील अंधारात साजरी करावी लागली. अद्यापही बंद असलेले दिवे सुरू करण्यात आलेले नाही.

ग्रामदैवत रामगिर बाबा टेकडीवरील काही ध्वनिक्षेपके सुमारे २ वर्षापासून बंद असल्याने नागरिकांना सांगण्यात येणाऱ्या सूचना ऐकण्यात गैरसमज होत आहे.

तसेच सुमारे ३० लाख रुपये खर्च करून शहरभर लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे अवघ्या महिनाभरातच बंद पडले आहेत. पुरुषांसह महिलांसाठी देखील गेल्या अनेक वर्षांमध्ये पालिकेने कुठेही नवीन शौचालय बांधलेले नाही.

विकास कामासाठी सुमारे एक-दीड वर्षापासून कोट्यवधी रुपये पालिकेत पडून आहेत. मात्र, ते देखील अद्यापपर्यंत खर्च केलेले नाही, असे म्हटले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe