झटका : महिंद्राची वाहने झाली महाग, चेक करा रेट

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 9 जानेवारी 2021 :- जर आपण महिंद्राची वाहने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आपल्या खिशावर चांगलाच बोजा पडू शकतो.

देशातील आघाडीची मोटार वाहन निर्माता कंपनी महिंद्र अँड महिंद्राने आपल्या सर्व खासगी आणि व्यावसायिक वाहनांच्या किंमतीत 1.9 टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे.

4500 रुपयांवरून 40000 रुपयांपर्यंत झाली वाढ :- ही माहिती महिंद्रा अँड महिंद्रा यांच्या तर्फे आज शुक्रवारी 8 जानेवारी रोजी दिली गेली आहे. कंपनीने आपल्या सर्व वाहनांची किंमत त्यांच्या किंमतीनुसार 4500 रुपये ते 40000 रुपयांपर्यंत वाढविल्या आहेत. मुंबईस्थित कार निर्मात्यांनी रेग्येलेटरी फाइलिंग दाखल करताना ही किंमत वाढल्याचे उघड केले आहे.

महिंद्र थारवर नवीन किंमत लागू होईल :- महिंद्रा अँड महिंद्राकडून सांगण्यात आले आहे की नवीन ‘थार’च्या बाबतीत 1 डिसेंबर 2020 ते 7 जानेवारी 2021 दरम्यान केलेल्या सर्व बुकिंगवरही दरवाढ लागू होईल.

कंपनीने म्हटले आहे की 8 जानेवारी 2021 पासून नवीन थारच्या सर्व नव्या बुकिंगची किंमत वितरणवेळी जी असेल ती लागू होईल. गेल्या वर्षी महिंद्राने लॉन्च केलेल्या नवीन थारला लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

या कंपन्यांनीही किंमत वाढविली :- कंपनीच्या ऑटोमोटिव्ह विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय नकरा म्हणाले की, गेल्या अनेक महिन्यांपासून वस्तूंच्या किंमती व इतर खर्चात वाढ झाल्याने भाववाढ होणे आवश्यक होते. ते म्हणाले की आम्ही आपला खर्च कमी करण्यासाठी आणि बऱ्याच काळापासून किंमतवाढ थांबविण्याचे सर्व प्रयत्न केले आहेत,

परंतु कच्च्या मालाच्या किंमती वाढल्यामुळे आम्ही 8 जानेवारी 2021 पासून किंमती वाढवत आहोत. गेल्या महिन्यात महिंद्रा अँड महिंद्राने सांगितले आहे की ते जानेवारीपासून आपल्या सर्व प्रवासी आणि व्यावसायिक वाहनांच्या किंमती वाढवतील. महिंद्राशिवाय मारुती, ह्युंदाई, फोर्ड, टोयोटा इत्यादी कंपन्यांनीही त्यांच्या वाहनांच्या किंमती वाढविण्याची घोषणा केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment