कितीही वाद झाले, तरी कोठे थांबायचे हे त्यांना माहिती!

Ahmednagarlive24
Published:

संगमनेर :- राज्याचे लक्ष लागलेल्या शिर्डी आणि संगमनेरमध्ये मंत्री राधाकृष्ण विखे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची ‘समझोता एक्स्प्रेस’ या वेळी देखील भन्नाट सुटली.

थोरात यांच्या विराेधात विखे घराण्यातील, तर विखेंच्या विरोधात थोरातांचे नातेवाईक असलेल्या तांबे घराण्यातील उमेदवार दिला जाईल, हा परस्परांचा दावा फोल ठरला.

त्यामुळे थोरातांविराेधात जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शालिनी विखे आणि विखेंच्या विरोधात आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या उमेदवारीची चर्चा चर्चाच राहिली.

शिर्डीतील थोरातांचा विखेंविरोधातील काँग्रेसचा उमेदवार कोण असेल, याची मोठी उत्सुकता राज्याला होती. मात्र, या जागेवर थोरातांचे चुलत बंधू सुरेश थोरात यांची उमेदवारी पुढे आल्याने उमेदवार देण्याची आैपचारिकता पूर्ण झाल्याचे बोलले जाते.

सुरेश थोरात काही काळ संगमनेर पंचायत समितीचे सदस्य होते. बाळासाहेब थोरात यांचे ते िनष्ठावंत मानले जातात.

संगमनेरातील नवले आणि शिर्डीतील थोरात यांच्या उमेदवारीमुळे या दोन्ही मतदारसंघांत पुन्हा एकदा समझोता एक्स्प्रेस धावू लागल्याची चर्चा मतदारसंघात सुरू आहे.

कोठे थांबायचे हे त्यांना माहिती!
वास्तविक संगमनेर व शिर्डी या दोन्ही मतदारसंघांत एकमेकांचा हस्तक्षेप थोरात व विखे दोघांनाही निश्चितच त्रासदायक ठरू शकला असता.

विखे-थोरात यांचा पूर्व इतिहास बघता कितीही वाद झाले, तरी नेमके कोठे थांबायचे हे या दोन्ही नेत्यांना चांगलेच माहिती आहे, असा अनेकांचा कयास यामुळे खरा ठरला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment