मुंबई: ‘जिओ’द्वारे लागू करण्यात येणरे हे शुल्क ‘जिओ’ ते ‘जिओ’ कॉल केल्यास, ‘जिओ’ ते स्थिरभाष दूरध्वनीवर (लॅण्डलाईन) कॉल केल्यास किंवा ‘जिओ’च्या इंटरनेटसेवेवरील व्हॉट्सअप किंवा तत्सम ध्वनीसंदेश (व्हॉईस कॉल) संपर्क सेवा पुरवणाऱ्या सुविधांसाठी लागू नसेल.
याशिवाय, ‘जिओ’च्या वापरकर्त्यांना भरावे लागणाऱ्या या शुल्काची परतफेड कंपनीकडून इंटरनेट डेटा सेवेच्या शुल्कातून भरून दिले जाईल. म्हणजेच, तेवढ्या पैशांचा अधिकचा डेटा वापरकर्त्यांना उपलब्ध होईल. दरम्यानस ‘जिओ’वर येणारे (इनकमिंग) कॉल मात्र पूर्वीप्रमाणेच मोफत असतील
२०१७मध्ये भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय)द्वारे प्रतिस्पर्धी नेटवर्क कंपन्यांच्या क्रमांकावर कॉल झाल्यास संबंधित कंपनीला सेवा पुरवठादार कंपनीनं ६ पैसे प्रति मिनिट शुल्क देण्याचे निर्देश दिले होते. विशेष म्हणजे आधी १४ पैसे प्रति मिनिट हा दर त्यावेळी ६ पैसे प्रति मिनिट करण्यात आला. जानेवारी २०२०पर्यंतच हे शुल्क लागू होते.
त्यामुळे ‘जिओ’नेही आतापर्यंत आपल्या ग्राहकांवर हे शुल्क लागू केले नाही. त्यापोटी, ‘जिओ’नं आतापर्यंत भारती एअरटेल, व्होडाफोन, आयडिया आदी कंपन्यांना १३५०० कोटी रूपये दिले. मात्र, ‘ट्राय’द्वारे हे शुल्क कायम ठेवण्यात येणार असल्याचे संकेत मिळत असल्यानं ‘जिओ’नं आता ही जबाबदारी ग्राहकांवर टाकली आहे. या शुल्काला इंटरकनेक्ट युसेज चार्ज अथवा IUC म्हणून ओळखलं जातं.
- Ahilyanagar Breaking : महिंद्रा बोलेरो विहिरीत पडली ! चार जणांचा जागीच मृत्यू
- तुमच्या पत्नीच्या नावे ‘या’ योजनेत खाते उघडा आणि 1 कोटी 12 लाखांचा परतावा मिळवा! जाणून घ्या कॅल्क्युलेशन
- अहिल्यानगर जिल्ह्यातील कोणत्या कारखान्याने दिला किती दर ? शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी
- एचडीएफसीच्या ‘या’ योजनेने गुंतवणूकदारांना केले कोट्याधीश! महिन्याला 2 हजाराची गुंतवणूक करून मिळाले 4 कोटी
- तुमच्याकडेही आहे का एनटीपीसी ग्रीन एनर्जीचा शेअर? तज्ञांकडून देण्यात आले SELL रेटिंग! कारण की…..