औरंगाबाद शहराच्या नामांतराच्या वादावरून रोहित पवार म्हणाले…

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2021 :-सध्या राज्यात शहरांच्या नामांतराचा विषय चांगलाच चर्चेचा बनला आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलेच वाद जुंपले होते.

नुकतेच आता या विषयावरून कर्जत – जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी एक महत्वाचे विधान केले आहे. औरंगाबादच्या नामांतराबाबत शिवसेनेची भूमिका आग्रही आणि विषय भावनिक आहे,

मात्र रोजगाराचा प्रश्न महत्त्वाचा असल्याचं रोहित पवार म्हणाले. तरुणांचा प्रतिनिधी म्हणून त्यांच्या रोजगाराचा प्रश्न महत्वाचा आहे. त्यामुळे त्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देणे गरजेचं आहे.

महाविकास आघाडी ही कॉमन मिनिमम प्रोग्रॅमवर काम करते. त्यामुळे अनेक प्रश्नांवर काम करायचे आहे” असे रोहित पवार म्हणाले. औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे.

मी माझं व्यक्तिगत मत अनेक वेळा मांडलं आहे. एखाद्या शहराचं, गावाचं नाव बदलायचं असेल, तर त्या गावातील लोकांनाही विश्वासात घ्यावं.

लोकशाही पद्धतीने किंवा अन्य माध्यमातून त्यांचं मत जाणून घेतलं, तर जो काय निकाल येईल, त्या निकालाला ताकद देण्याची जबाबदारी सरकारची असेल” असं रोहित पवार म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe