शेहला रशीदने राजकारण सोडले !

Published on -

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील लोकांवर होत असलेले अत्याचार सहन होत नसल्याचे सांगत सहा महिन्यांपूर्वी मुख्य राजकारणात आलेली ‘जेएनयू’ची माजी विद्यार्थी नेता शेहला रशीदने बुधवारी राजकारण सोडण्याची घोषणा केली. काश्मीर खोऱ्यात बीडीसी निवडणूक होणार असताना शेहलाने हा निर्णय घेतला आहे.

शेहलाने मार्च महिन्यात माजी आयएसएस अधिकारी शाह फैसल यांच्या जम्मू-काश्मीर पीपल्स मुव्हमेंट (जेकेपीएम) पक्षामध्ये प्रवेश केला होता. जम्मू-काश्मीर खोऱ्यात गटविकास परिषद अर्थात बीडीसीच्या निवडणुका घेऊन केंद्र सरकारला लोकशाही जिवंत असल्याचे दाखवायचे आहे; परंतु या ठिकाणी लोकांवर अत्याचार केले जात आहेत.

अशा स्थितीत आपण निवडणुकीत भाग घेऊ शकत नाही. त्यामुळे मी राजकारणातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, अन्याय-अत्याचाराविरोधातील आपली लढाई सुरूच राहणार असल्याचे शेहला रशीदने स्पष्ट केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News