संगमनेर – जो बेरोजगार आहे, त्याला आम्ही संधी देणार आहोत. शेतकऱ्यांना एक रुपयात प्राथमिक आरोग्य चाचणीची सुविधा देणार. शेतकऱ्यांना कर्जमुक्तच नव्हे तर चिंतामुक्त करणार, भूमिपुत्रांना नोकऱ्या देण्याची आमची मागणी असल्याची ग्वाही शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली. संगमनेरमध्ये ते बोलत होते.
उध्दव ठाकरे पुढे म्हणाले की, ही परिवर्तनाची लाट आहे. लोकांनी मनोमन विचार केला आहे. तेव्हा बाळासाहेब थोरात यांनी मनाने घरी जायला हरकत नाही, तुमचा नेता बँकॉकला पोहचला आहे, म्हणून तुम्ही आता घरी बसा .
प्रचार ही करु नका, नाही तरी जनता तुम्हाला घरी बसवणारचं आहे. युती सरकारने लोकांसमोर हिताचे मुद्ददे मांडले. त्यामुळे विरोधकांचे बारा वाजणारचं हे ठरलेले आहे. स्वतः सत्तेपासून दूर गेल्यावर बेरोजगारी काय असते ते त्यांना कळले. त्यामुळे ते आता खोटी आश्वासने देऊ लागले आहेत.
ज्या शिवसैनिकांसाठी जागा देऊ शकलो नाही, त्यांची माफी मागतो. त्यांनी नाराजी दर सारून आपल्या भागातील भाजपच्या उमेदवाराच्या विजयासाठी प्रयत्न करावे. राधाकृष्ण विखे यांनी विरोधी पक्षनेता म्हणून चांगले काम केले.
मात्र त्यांच्या लक्षात आले की चांगल्या कामाला आपण उगाच विरोध करत आहोत. त्यामुळे ते आमच्यात येऊन सामील झाले. त्यांनी हे धाडस दाखविले उद्या आपले सरकार येणार आहे. जे खरं आहे ते सांगायला ठाकरे घाबरत नाही.