पद्मश्री पवार व आमदार जगताप यांच्या हस्ते विधाते यांचा सत्कार

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2021 :- राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते परदेश दौर्‍यावर निघाले असता त्यांचा आदर्श गाव संकल्प व कार्य समितीचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार व आमदार अरुणकाका जगताप यांनी सत्कार करुन शुभेच्छा दिल्या.

यावेळी राष्ट्रवादी ओबीसी सेलचे अमित खामकर, गणेश गोंडाळ, राजेश भंडारी आदी उपस्थित होते. प्रा. माणिक विधाते युएसएला जात असून, त्यांना या दौर्‍यासाठी यावेळी शुभेच्छा देण्यात आल्या. पद्मश्री पोपटराव पवार यांनी राजकारणात अभ्यासू व्यक्तीमत्वाला किंमत असून,

विधाते सरांनी पक्षाची धुरा चांगल्या पध्दतीने सांभाळली असल्याचे सांगितले. आमदार अरुणकाका जगताप यांनी प्रा. विधाते यांचे शहराच्या राजकारणात निष्ठेने व प्रमाणिकपणे कार्य सुरु असून, त्यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे स्पष्ट केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News