अहमदनगरच्या बहुचर्चित उड्डाणपुलाचे पुन्हा होणार भूमिपूजन,भाजपचे हे मोठे मंत्री येणार !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 27 जानेवारी 2021 :- अहमदनगर शहरातील उड्डाणपुलाचे काम सुरू झाल्याने हा पुल आता होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

त्यामुळे येत्या १५ ते ३० फेब्रुवारी दरम्यान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना नगरला आणून त्यांच्या हस्ते उड्डाणपुलाचे भूमिपूजन करणार असल्याचे खासदार सुजय विखे यांनी सांगितले.

यावेळी त्यांची व्हीआरडीई संस्थेला भेट तसेच केके रेंज बाधित २३ गावांच्या सरपंचांची त्यांची भेट घडवून दिली जाणार असल्याचेही ते म्हणाले.

नगरच्या बायपास मजबुतीकरणासाठी 800 कोटी तसेच नगर ते शिर्डी रस्त्यासाठी ५०० कोटी रुपये मंजूर झाले असल्याने केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ७ मार्चला या दोन्ही कामांचे भूमिपूजन केले जाणार असल्याचेही डॉ. विखेंनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News