अहमदनगर Live24 टीम, 27 जानेवारी 2021 :- दिल्लीमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलकांनी ट्रॅक्टर मार्च आयोजित केला. या ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागलं.
आता या संपूर्ण प्रकरणावर कंगना रनौतने एक ट्विट केलं आहे आणि यामध्ये तिने मोठा खुलासाही केला आहे.
कंगना म्हणाली जेव्हा मी या आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना दहशतवादी म्हटलं होतं. त्यावेळेला या शेतकऱ्यांचे समर्थन केले होते. त्यांनी मला सांगितले आहे की, तुम्ही शेतकऱ्यांना दहशदवादी म्हटल्यामुळे आम्ही तुम्हाला ब्रँड अॅम्बेसेडर बनवू शकत नाहीत.
आता मी त्यांना सांगू इच्छित आहे की, जे आज झालेल्या हिंसेला पाठिंबा देत आहेत ते सुध्दा दहशदवादी आहेत.कंगना धाकड च्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. शूटिंग दरम्यान कंगनाला एका आंदोलनाचा सामना करावा लागला होता. भोपाळमध्ये कंगनाच्या शूटच्या वेळी एका राजकीय गटाने कंगनाविरोधात जोरदार आंदोलन करत घोषणा दिल्या होत्या.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved