जिल्ह्यातून आणखी दोघेजण एक वर्षभर हद्दपार 

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 27 जानेवारी 2021 :- नगर उपविभागीय दंडाधिकारी तथा नगर भाग प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी प्राप्त अधिकार शक्तीचा वापर करीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या उद्देशाने आणखी दोघा जणांना एक वर्षाच्या अवधीसाठी जिल्ह्यातून हद्दपार केले आहे.

हे दोघेही नगर शहर परिसरातील आहेत. गणेश शिवाजी लोखंडे (रा. केडगाव) आणि रियाज उर्फ तात्या मुस्ताक सय्यद (रा,जुना बाजार, बारातोटी कारंजा जवळ, नगर) अशी त्यांची नावे आहेत.

नगर उपविभागीय दंडाधिकारी यांचेकडे पोलीस विभागाकडून या दोघांच्या कारवाई संबंधी प्रस्ताव दाखल झाले होते. पोलीस ठाण्यांकडून दाखल करण्यात आलेल्या प्रस्तावात त्यांच्या  विरुध्द पोलीसात दाखल असलेल्या गुन्ह्यांची सूची नमूद करण्यात आली.

तसेच संबंधीतांकडून कायदा ,सुव्यवस्थेस बाधा निर्माण होण्याची शक्यता वर्तवीण्यात आली. पोलीस ठाण्याकडून प्राप्त प्रस्तावावर विचारविनिमय करीत उपविभागीय दंडाधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी दोघांना आदेश जारी झाल्याच्या तारखेपासून आगामी एक वर्षांच्या अवधीसाठी जिल्हा हद्दीतून हद्दपार केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe