अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2021 :-जिल्ह्यात रविवार दिनांक 31 जानेवारी,2021 रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबविली जाणार आहे.
पल्स पोलिओ लसीकरणाकरीता अहमदनगर जिल्हयामध्ये 0 ते 5 वर्षे वयोगटातील ग्रामिण भागात 3 लाख 77 हजार 358 शहरी भागात 16 हजार 669 व महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये ४६ हजार 260 असे जिल्हयामध्ये एकूण 4 लाख 40 हजार 287 बालकांना पोलिओ लसीचे डोस पाजण्यात येणार आहेत.
दि. 31 जानेवारी 2021 रोजी ग्रामीण भागात 3 हजार 521 बुथ, शहरी भागात 87 व महानगरपालिका क्षेत्रात 374 असे एकूण जिल्हयामध्ये 3 हजार 982 बुथवर एकूण 9 हजार 110 कर्मचा-यांमार्फत पोलिओ लसीचे डोस पाजण्यात येणार आहेत.राज्यस्तरावरुन अहमदनगर जिल्हयाकरीता 6 लाख 10 हजार पोलिओ लसीचे डोस प्राप्त झाले आहेत,
अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनी दिली आहे.नागरिकांनी या मोहिमेमध्ये आपल्या 0 ते 5 वर्षे वयाच्या बालकांना यापूर्वी पोलिओ डोस दिला असला तरी या मोहिमेमध्ये पुन्हा पोलिओ डोस घेऊन राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम 100 टक्के यशस्वी करावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved