अत्यंत महत्वाची बातमी : नगर शहरातून प्रवास करत असाल तर हे वाचाच…

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 29 जानेवारी 2021 :-अहमदनगर शहरातील अशोक हॉटेल ते सक्कर चौका दरम्यान उड्डाणपुलाचे काम सुरू झालेले असून या कामामुळे जिल्हाधिकारी कार्यालयापुढील शासकीय पोस्ट ऑफीसपासून जीपीओ चौकाकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना गुरुवारी (दि.२८) ते ११ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजेपर्यंत प्रवेश बंदी करण्यात आली आहे.

जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी मुंबई पोलिस अधीनियम 1951 चे कलम 33 (1) (ब) अन्वये सदरचे आदेश बुधवारी (दि.२७) सायंकाळी काढले आहेत.

उड्डाणपुलाच्या कामासाठी जीपीओ चौकात पिलर उभारणी करण्यात येणार आहे त्यासाठी चौकामध्येच खड्डा करण्यात येणार आहे. या कामामुळे वाहतुकीची कोंडी होण्याची दाट शक्यता आहे तसेच वाहतुकीमुळे गंभीर किंवा किरकोळ अपघात होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार आहे.

त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय ते जीपीओ चौक रस्त्यावरील वाहतुक इतर मार्गाने वळविण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालय रस्त्याने शासकीय पोस्ट ऑफीसपासून जीपीओ चौकाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाकडून भिंगारकडे जाण्यासाठीची सर्व वाहतूक पोस्ट ऑफीस येथून अशोका हॉटेल मार्गे वळविण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जीपीओ चौक मार्गे पुणेकडे जाणारी वाहतूक पराग बिल्डींग ते चांदणी चौक मार्गे नगर पुणे रोडकडे वळविण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe