फरार बोठेच्या अटकेसाठी थेट गृहमंत्र्यांना साकडं

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 29 जानेवारी 2021 :-यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे पाटील यांची काही दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली होती.

या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी हत्याकांडाचा सूत्रधार सूत्रधार पत्रकार बाळ. ज. बोठे याच्या अटकेसाठी पोलीस कसोशीने प्रयत्न करत आहे, मात्र पोलिसांना यश येत नाही आहे.

फरार बाळाचा तातडीने शोध घेण्यात यावा व त्याला अटक करण्यात यावी यासाठी अ‍ॅड. सुरेश लगड यांनी थेट गृहमंत्र्यांना पत्र पाठविले आहे.

एसपी आणि तपासी अधिकारी डीवायएसपींना बोठेच्या मुसक्या आवळण्यासंदर्भात निर्देश द्यावेत, अशी मागणी पत्रात करण्यात आली आहे.

बोठे गेल्या अनेक दिवसांपासून फरार आहे. त्याला पकडण्यात पोलिस पथकाला अपयश येत आहे. दरम्यान नगर एलसीबीने अनेक सराईत व फरार गुन्हेगाराच्या मुसक्या आवळलेल्या आहेत,

मात्र डॉक्टर, वकिलीची डिग्री संपादन करणारा मास्टरमाइंड शोध घेऊनही सापडत नाही, ही गंभीर बाब आहे. गुन्ह्याच्या तपासाचा वेग वाढवा,

कुठल्याही परिस्थितीत फरारी बोठेच्या मुसक्या आवळण्याचा कसोशीने प्रयत्न करण्याचे निर्देश एसपींना द्यावेत अशी मागणी अ‍ॅड. लगड यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe