रिटायर्ड पोलिस कर्मचाऱ्याचीच सोन्याची चेन चोरण्याचा प्रयत्न

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 02 फेब्रुवारी 2021:- जिल्ह्यात चोऱ्या, लुटमारी आदी घटनांचा सुळसुळाट झाला आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिक चांगलेच हैराण झाले आहे.

सामान्य जनतेबरोबरच चोरटयांनी चक्क पोलिसांना देखील लुटण्याचा प्रकार नुकताच घडला आहे. शहरातील माळीवाडा बसस्थानकात बसमध्ये चढत असताना सेवानिवृत्त पोलिस कर्मचाऱ्याचीच सोन्याची चेन चोरण्याचा प्रयत्न करण्यात आला.

या प्रकरणी राहुल बाबूराव भालेराव (वय ३०, रा.नारळा डांगरवाडी, पैठण) या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. बयाजी शिवराम थोरात यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार कोतवाली पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.ही घटना ३१ जानेवारी रोजी घडली.

बयाजी थोरात हे सेवानिवृत्त पोलिस कर्मचारी असून, ते माळीवाडा बसस्थानकात एका बसमध्ये प्रवासासाठी चढत असताना आरोपीने त्यांच्या गळ्यातील दीड तोळे सोन्याची चेन ओढून चोरण्याचा प्रयत्न केला. पुढील तपास सपोनि. विवेक पवार हे करत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News