कामगाराने दुकानातील रोकड लांबविली

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 03 फेब्रुवारी 2021:- शहरातील आईस्क्रीमच्या दुकानात काम करत असलेल्या कामगाराने दुकानातच डल्ला मारला आहे.

याबाबत शहरातील कोतवाली पोलिस ठाण्यात अंकुश ताराचंद कुकरेजा (वय 21, रा. बालिकाश्रम रोड, अहमदनगर) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी अंकुश कुकरेजा यांच्या मालकीचे शहरातील बालिकाश्रम रस्त्यावर रॉयल आईस्क्रिम नावाचे दुकान आहे.

कुकरेजा यांच्या दुकानात आरोपी हरूण अन्सारी (रा. मोहल्ला जाटान, बी 2 बिजनौर, उत्तरप्रदेश) हा कामाला आहे. दरम्यान आरोपी अन्सारीने मंगळवार (दि. 2 फेब्रुवारी) रोजी दुपारच्या सुमारास दुकानाच्या गल्ल्यातील 30 हजार रूपयांची रोकड चोरून नेली.

कुकरेजा यांच्या फिर्यादीवरून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोहेकॉ. शिंदे करत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe