शहरात भिशीचा व्यवसाय जोरात

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 05 फेब्रुवारी 2021:- संगमनेर कायदेशीर मान्यता नसतानाही शहरात भिशी व्यवसाय खुलेआम सुरू आहे. एकमेकांच्या विश्वासावर हा व्यवसाय सुरू असून सामान्य नागरीकांपासून मोठ्या व्यापार्‍यांपर्यंत यात सहभागी आहेत.

5 हजारांपासून ते 50 लाखांपर्यंत भिशी लावण्यात येत आहे. यातून अनेक भिशीचालक मालामाल झाले आहेत. शहरात मोठ्या प्रमाणावर फोफवलेल्या या व्यवसायाकडे संबंधित खात्यांच्या अधिकार्‍यांचे दुर्लक्ष आहे.

यामुळे अनेकांची फसवणूक झाली आहे. काही महिन्यांपूर्वी दोघा भिशी चालकांनी लाखो रुपये घेऊन पलायन केले होते. यामुळे अनेकांना आर्थिक भूर्दंड सोसावा लागला होता.

भिशीच्या पैशांवरून मागील महिन्यात शहरात दोन गटांत हाणामारीही झाली होती. अनेक ठिकाणी दररोज वसुलीची पध्दत असल्याने भिशीचालक मालामाल झाले आहेत.

यामुळे काही भिशी चालकांची मग्रुरी वाढली आहे. या व्यवसायातून अनेकांनी जागा, घरे घेतली आहे. काही भिशी बंद पडल्याने त्यांच्यासमोर आर्थिक विवंचना निर्माण झाली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News