किरकोळ वादावरून दोन गटात हाणामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 05 फेब्रुवारी 2021:- शेकोटी पेटविण्याच्या कारणावरून दोन गटांत बांबू, काठीने झालेल्या हाणामारीत सहा जण गंभीर जखमी झाले असल्याची घटना घडली आहे. दरम्यान हि घटना कोपरगाव तालुक्यातील सांगवी भुसार येथे घडली आहे.

याप्रकरणी दोन्ही गटांने एकमेकांविरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, सांगवी भुसार येथे राजेंद्र बाजीराव जाधव व विरोधी गटाचे संजय मनोहर महाले हे दोन कुटुंब शेजारी राहत असल्याने फिर्यादी राजेंद्र बाजीराव जाधव यांची मुले शेकोटी करून शेकत असताना आरोपी संजय महाले,

अमोल संजय महाले व निलेश संजय महाले त्याठिकाणी आले. त्यांनी शिव्या देण्यास सुरुवात केली. फिर्यादीची पत्नी वंदना जाधव हिने सदरची घटना सासरे, दीर यांना फोनवरून सांगितली. त्यांनी आरोपींना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.

आरोपी संजय मनोहर महाले, अमोल मनोहर महाले, निलेश संजय महाले यांनी फिर्यादी जाधव यांना शिवीगाळ, दमदाटी करून बांबू व काठीच्या सहाय्याने व लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.

यात राजेंद्र जाधव, काकासाहेब बाजीराव जाधव, बाजीराव शंकर जाधव आदी तीन जण जखमी झाले. दुसर्‍या फिर्याद निलेश संजय महाले यांनी दाखल केली.

त्यांनी आरोपी राजेंद्र बाजीराव जाधव, काकासाहेब बाजीराव जाधव, बाजीराव शंकर जाधव आदी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यात त्यांनी आपले वडिल संजय महाले यांनी आरोपीच्या मुलांना शेकोटी करण्यास मज्जाव केला असता त्यांना समजावून सांगत असताना आरोपी राजेंद्र जाधव,

काकासाहेब जाधव, बाजीराव जाधव यांनी फिर्यादीचे वडील व भाऊ यांना शिवीगाळ करून दमदाटी केली व लाथा बुक्क्यांनी व लाकडी दांडक्याने मारहाण केली आहे.

लाकडी दांडक्याने अमोल संजय महाले, यांचे डोक्यावर व हातावर मारहाण करून हात मोडला असून गंभीर दुखापत केली आहे. या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी दोन्ही गटाच्या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News