उर्मिला मातोंडकर यांची केंद्र सरकारवर जोरदार टीका, म्हणाल्या…

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 05 फेब्रुवारी 2021:- शेतकरी आंदोलनावरून देशभरात सेलिब्रिटींसह विदेशी कलाकारांनीही समर्थनार्थ आणि विरोधात मत व्यक्त केले आहे.

यात आता शिवसेना नेत्या, अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनीही उडी घेतली आहे. मातोंडकर यांनी शेतकरी आंदोलनाच्या समर्थनाची भूमिका मांडली आहे.

सीमेवर खिळे ठोकणारी प्रतिमा जगासमोर गेली तर लोक बोलणारच ना, अशी टीका केंद्र सरकारवर केली आहे. या वेळी त्यांनी शरजील उस्मानीच्या विधानावर तीव्र शब्दात टीका केली आहे.

अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी वाढदिवसानिमित्त गरजू महिलांना उपयोगी वस्तू आणि लहान मुलांना खाऊ वाटप केले.

विलेपार्ले इथे उर्मिला मातोंडकर यांनी स्वत: उपस्थिती लावून चिमुकल्यांसोबत वाढदिवसाचे सेलिब्रेशन केले. या वेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले.

शरजील उस्मानीने केलेल्या विधानावर टीका केली. त्या म्हणाल्या, कुठल्याही धर्माचा अपमान करण चुकीचे आहे. मी त्याच्या विधानाचा जाहीर निषेध करेन.

आपला देश सध्या अत्यंत कठीण परिस्थितीतून जात आहे. त्यामुळे कोणत्याही धर्माच्या, जातीच्या व्यक्तीने कोणत्याही विषयावर बोलताना विचारपूर्वक बोलावे.

मातोंडकर म्हणाल्या, शेतकरी आपल्या देशाचा कणा आहे. आज जर शेतकरीच खुश नसेल, त्यांच्या विरोधातील कायदे आणले असतील, तर याकरिता विचार केला पाहिजे. शेतकरी आंदोलनात ५० ते ६० लोकांचा जीव गेला आहे.

ते थंडीत बसले आहेत. त्यांना देशद्रोही, खलिस्तानी अशी नावे ठेवून विटंबना केली जात आहे. त्यांच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण होवोत यावर काहीतरी उपाय निघावा.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News