स्टार प्रचारक कन्हैया कुमार गुरुवारी नगरमध्ये

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर – शहर विधानसभा मतदार संघतील भारतीय कम्युनिस्ट पक्ष व डाव्या लोकशाही आघाडीचे  उमेदवार भैरवनाथ तुकाराम वाकळे यांच्या प्रचारार्थ गुरुवार दि.17 ऑक्टोबर रोजी जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी दिल्लीचे (जेएनयू) विद्यार्थी संघाचे माजी अध्यक्ष तथा भाकपचे राष्ट्रीय कार्यकारीणी सदस्य कन्हैया कुमार यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

गुरुवारी सकाळी 11 वाजता टिळक रोडवरील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात ही सभा होणार असून, या सभेची जोरदार तयारी चालू असल्याची माहिती राज्य सहसचिव अ‍ॅड.सुभाष लांडे यांनी दिली. युवकांमध्ये कन्हैया कुमार यांचे खास आकर्षण असून, ते सध्या भाकपचे स्टार प्रचारक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या सभेसाठी युवक मोठी गर्दी करत असतात.

कन्हैया कुमार या सभेत सद्य राजकीय ,आर्थिक, सामाजिक परिस्थितीवर विचार मांडणार आहेत. या सभेला नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कॉ.शंकर न्यालपेल्ली, अ‍ॅड.सुधीर टोकेकर, दिपक क्षीरसाठ, सगुना श्रीमल, दिपक नेटके, चंद्रकांत माळी, तुषार सोनवणे, विजय केदारे, सुनिल ठाकरे यांनी केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment