बेलपिपळगाव – नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव गटातील ज्येष्ठ कार्यकर्ते माजी पंचायत समिती सभापती अशोकराव शेळके यांनी क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे स्टार प्रचारक प्रशांत गडाख यांच्या उपस्थितीत क्रांतिकारी शेतकरी पक्षात प्रवेश करून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आ. मुरकुटे याना मोठा धक्का दिला आहे.
अशोकराव शेळके यांच्या क्रांतिकारी शेतकरी पक्षातील प्रवेशाने आ. मुरकुटे यांनी पाच वर्षात कार्यकर्त्यांना पायदळी तुडवून पाहुण्यांच्या विकासासाठीच सत्तेचा वापर केल्याची जोरदार चर्चा आहे. २०१४ ला आमदार मुरकुटे यांना निवडून आणण्यासाठी गडाखांशी विरोध पत्करून ज्या सच्चा कार्यकर्त्यांनी जिवाचे रान केले होते.
असे सगळेच कार्यकर्ते आज आ. मुरकुटे यांना जा घरी म्हणत क्रांतिकारीचा झेंडा हाती घेऊन शंकरराव गडाख यांना विजयी करूण आ. मुरकुटे यांना घरी बसविण्याचे आव्हान स्वीकारले आहे.
यावेळी खरवंडी गटातील जेष्ठ नेते दादासाहेब होन, युवा नेते संभाजी माळवदे, संतोष होन, यमासाहेब होन आदी उपस्थित होते.