शेवगाव : राज्याच्या १५ वर्षामध्ये हजारो कोटीचे भ्रष्टाचार करुन शेतकऱ्यांवर गोळीबार करणारे राष्ट्रवादी कॉग्रस सरकार आणि त्यांचे उमेदवार निवडणुकीच्या वेळी शेतकरी आणि पाणी प्रश्नावर काम करण्यास सुरवात केली मात्र या निवडणूकीत राष्ट्रवादीला तीस पेक्षा जास्त जागा मिळणार नसून त्यांचा सुपडासाफ होईल, असा प्रबळ दावा खा. सुजय विखे यांनी केला. महायुतीचे उमेदवार आ. मोनिकाताई राजळे यांच्या प्रचारार्थ भातकुडगाव येथील प्रचार सभेत ते बोलत होते.
विरोधी उमेदवार जातीपाती चे राजकारण करत आहेत, असा आरोप करत ते म्हणाले की, मतदार संघाचा इतिहास त्यांना माहिती नाही, पाटपाण्यासाठी टेलला असलेल्या गावांना पाणी पोहचविण्याचा प्रयत्न केला.
सर्व बंधारे शेतकऱ्यांना भरुन देण्यात आली. आहेत हे यांना अजून माहिती नसल्याचे टीका खा. विखे यांनी ॲड. ढाकणे यांच्यावर केली. राज्यात ३० पेक्षा जास्त जागा राष्ट्रवादीच्या येणार नाहीत. कॉग्रेस कुठे आहे, त्यांनाच माहीती नाही.
राज्यात निवडणुका असतांना राष्ट्रीय अध्यक्ष बॅंकॉकला फिरण्यासाठी गेले आहेत. इतकी विचित्र परिस्थिती आहे. राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येणार आहे. त्यामुळे आपल्या मतदार संघाचा विकास करण्यासाठी प्रामाणिक आणि शांत स्वभावाच्या आमदार मोनिकाताई राजळे यांना साथ द्या, असे आवाहन त्यांनी केले.
ते पुढे म्हणाले की, पाचवर्षाच्या काळामध्ये काम करत असतांना जात-धर्म किंवा शेवगाव-पाथर्डी असा कुठलाही दुजाभाव न करता केंद्र व राज्य शासनाच्या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्याचा प्रामाणिक प्रयत्न तसेच वैयक्तिक व सार्वजनिक सुख-दुखामध्ये सहभागी होण्याचे काम केले. परंतु सध्या स्वार्थासाठी काही पुढारी अचानक तिकीट घेउन जातीपातीचे राजकारण करण्याचा प्रयत्न करत असून, समाजा-समाजामध्ये दुजाभाव बनविण्याचे काम करत आहेत.
त्यांची चाल जनतेने विचारात घेण्याचे काम आहे, मतदार संघात आकराशे कोटीचे काम केली विकास यांना माहिती नाही पण झालेल्या कामाचे भांडवल करत आहेत. पाण्याचे राजकारण करत असतांना त्यांना माहीत नाही की शेवगाव तालुका हा टेल शेवटला आहे त्यामुळे पाणी आणण्यात यश आले हे त्यांना माहितीच नाही, अशी कोपरखिळी त्यांनी ढाकणे यांना मारली.
- सीडीएसएल शेअर्समध्ये मोठी घसरण! जाणून घ्या यामागील कारणे
- मोठी बातमी ! ‘या’ राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 3 वर्षांनी वाढले
- महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा धक्का ! महागाई भत्ता वाढीचा निर्णय पुन्हा लांबणीवर, केव्हा होणार 3% DA वाढीचा निर्णय?
- मार्च 2025 पर्यंत पुणे रिंग रोडचे भूसंपादन पूर्ण होणार! ‘या’ तारखेपर्यंत पूर्ण होणार प्रकल्पाचे काम
- मौनी अमावस्येच्या दिवशी करा ‘हे’ उपाय आणि मिळवा आयुष्यात सुखशांती