अहमदनगर ब्रेकिंग : फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीवर बलात्कार…

अहमदनगर Live24 टीम, 12 ऑगस्ट 2021 :-  श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर परिसरात राहणार्या 22 वर्ष वयाच्या तरुणीचे अश्लील फोटो काढून ते इंटरनेटवर व्हायरल करण्याची धमकी देऊन तसेच कोल्ड्रिंक्स पाजून या तरुणीवर आरोपी अमित प्रकाश चांदणे,वय 24 राहणार- वडगाव गुप्ता,तालुका नगर याने बलात्कार केल्याची घटना घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,आरोपी अमित याने तरुणीला सावेडी भागातील हॉटेल परिचय येथे वकिलाला भेटण्याच्या बहाण्याने मोटरसायकलवर बसून नेले व त्याठिकाणी तिच्याविरुद्ध वरील प्रमाणे अत्याचार केला.

पीडित तरुणी ही मुळची बेलापूरची असून ती सध्या नगर या ठिकाणी राहावयास आहे.तिच्या तक्रारीवरून तोफखाना पोलिस ठाण्यात आरोपी अमित प्रकाश चांदणेच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलिस करत आहेत.