अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. यामुळे यंदाचे गणेशोत्सव साध्य पद्धतीने साजरा करण्याचे आदेश सरकारने दिले आहे. त्यामुळे संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता गणेश मंडळांनी साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यासाठी पोलिसांनी मूर्ती कारखानदारांना नोटीसा दिल्या आहेत. शासन नियमानुसार घरगुती गणेश मूर्तीची उंची दोन फूट तर, सार्वजनिक गणेश मूर्तीची उंची चार फूट असावी अन्यथा गुन्हे दाखल करण्यात येतील, असे नोटीसीद्वारे पोलिसांनी मूर्ती कारखानदारांना कळविले आहे.
यासाठी गणेशोत्सव बाबत मार्गदर्शन सुचना जारी केल्या आहेत. नगर शहरामध्ये मानाच्या गणेश मंडळासह अनेक सार्वजनिक मंडळाकडून गणेशोत्सवाचे आयोजन केले जाते. परंतु, यंदा गणेशोत्सवावर करोनाचे सावट असल्याने जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, शहर उपअधीक्षक संदीप मिटके यांनी शहरातील मंडळ प्रमुखांची बैठक घेतली होती.
यावेळी गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन केले. मिरवणुका न काढता, मंडप न घालता घरच्या घरीच बाप्पांची मूर्ती स्थापन करण्याची सूचना यावेळी करण्यात आल्या. मंडळांच्या मागणीनुसार मोठ्या व आकर्षक गणेश मूर्ती तयार केल्या जातात.
यंदा मात्र सरकारने सार्वजनिक गणेश मूर्ती चार फूट व घरगुती गणेश मूर्ती दोन फूट असावी असे स्पष्ट केले आहे. यासाठी शहर पोलिसांनी मूर्ती तयार करणाऱ्या कारखान्याच्या मालकांना नोटीस दिल्या आहेत. घरगुती गणपती स्थापनेकरीता गणेशाची मूर्ती खरेदी करण्यासाठी आलेल्या गणेश भक्तांना दोन फूटापेक्षा आणि सार्वजनिक गणेश उत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना चार फूटापेक्षा जास्त उंची असलेली गणेशाची मूर्ती विक्री करू नये,
असे शहर पोलिसांनी सर्व मूर्ती कारखानदारांना कळविले आहे. एखाद्या गणेश मूर्तीची उंची चार फूटापेक्षा जास्त आढळून आल्यास त्या कारखानदारांविरुध्द्व गुन्हे दाखल करण्यात येतील असेही कळविण्यात आले आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved