समाज बिघडला तर व्यवस्था बिघडते, व्यवस्थेला दोष देण्याची प्रवृत्ती म्हणजेच मानवाधिकाराचे उल्लंघन – पद्मश्री पोपट पवार

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2020 :-आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनानिमित्ताने कोरोना काळात मानवाधिकार संरक्षणासाठी महत्वपूर्ण भूमिका घेवून दीपस्तंभासारखे उल्लेखनीय कार्य करणार्‍या व्यक्तींना मानवाधिकार अभियानामार्फत पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते दीपस्तंभ पुरस्काराने सन्मानित करण्यात आहे.

पुरस्काराचे वितरण समारंभ सी.एस.आर.डी. समाजकार्य महाविद्यालय या ठिकाणी आयोजीत करण्यात आला होता. हजारो स्थलांतरित मजुरांसाठी देवदूत ठरलेल्या सी.एस.आर.डी. चे संचालक डॉ.सुरेश पठारे,

भिंगार भागातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात यशस्वी ठरलेले भिंगार छावणी परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी विद्याधर पवार, रस्त्यावर उतरून लोकांना शिस्त लावल्यासोबतच अनेकांच्या गरजा भागवनारे उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके, अहमदनगर महानगरपालिका मार्फत कम्युनिटी किचन सुरू करून रोज हजारो लोकांना मोफत भोजन व्यवस्था करणारे अहमदनगर महानगरपालिकाचे पाणी पुरवठा अधिकारी परिमल निकम,

ग्रामीण भागात कोरोणाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी योगदान देणारे खातगाव टाकळीचे उपसरपंच ज्ञानेश्‍वर पठारे तसेच आरोग्य क्षेत्रातील अतुलनीय योगदनाबद्दल बुथ हॉस्पिटलचे प्रशासक मेजर देवदान कळकुंबे यांना विशेष पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

यावेळी मानवाधिकार अभियानचे प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. संतोष गायकवाड, संध्या मेढे, सॅम्युअल वाघमारे, अनिल गंगावणे, योगेश तुपविहीरे, विठ्ठल कोतकर, जालिंदर बोरुडे, गणेश ननावरे, संजय कांबळे, दिपक पुरी, प्रकाश पाचारणे, राजेंद्र सातपुते, आशा हरे, दिपक अमृत, दिपक गायकवाड, हर्षल कांबळे, विवेक भिंगारदिवे, अविनाश भोसले, किरण दाभाडे, राहूल आल्हाट, राहूल गायकवाड,

लखन शिंदे, रामदास गायकवाड, अविनाश कांबळे, इंजि. विजय काकडे, प्रमोद मुळे, श्याम कांबळे, संदीप शेलार, आनंद शेलार आदी मान्यवर उपस्थित होते. पद्मश्री पोपटराव पवार म्हणाले की, समाज बिघडला तर व्यवस्था बिघडते. व्यवस्थेला दोष देण्याची प्रवृत्ती म्हणजेच मानवाधिकाराचे उल्लंघन आहे.

मनुष्य हा सुरक्षित राहण्यासाठी प्राण्याच्या कळपातून बाहेर पडला व मानवीहक्काचे संरक्षण करु लागला. मानवीहक्काचे उल्लंघन होत असताना छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदिंसह महापुरुष व संतांनी पुढाकार घेऊन समाज घडविण्याचे कार्य केले. कोरोना हे संकट मनुष्यसेवेची संधी म्हणून आली होती.

अनेकांनी या संधीद्वारे मनुष्यसेवा केली. पैश्याने व उच्च शिक्षण घेऊन जग बदलत नाही. अंतर्मनाची, संस्काराची व मायेची जोड मिळाल्यास समाजात परिवर्तन घडत असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या प्रारंभी संध्या मेढे यांनी संविधान प्रास्ताविक वाचन केले.

मानवाधिकार अभियानचे प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. संतोष गायकवाड यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कार्याक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अमोल बागुल यांनी केले. आभार अहमदनगर दक्षिणेचे जिल्हाध्यक्ष गंगावणे यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमचा समारोप करण्यात आला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!