लखीमपुर घटनेचा अहमदनगर राष्ट्रवादी युवक कडून भाजप सरकारचा निषेध नोंदवून मंत्रीपुत्राचा प्रतीकात्मक पुतळा दहन.

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 12 ऑक्टोबर 2021 :-   उत्तर प्रदेशातील लखीमपुर येथे केंद्रातील मंत्र्यांच्या गाडीखाली शेतकऱ्यांना चिरडून टाकण्यात आलेल्या घटनेच्या निषेधार्थ अहमदनगर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने भिंगार येथे मंत्रीपुत्राचा प्रतीकात्मक पुतळा दहन करण्यात आला

व केंद्रातील भाजप सरकारच्या जाहीर निषेध करून घोषणाबाजी करण्यात आली व हुतात्मा झालेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

आमदार संग्राम जगताप यांच्या सूचनेनुसार अहमदनगर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने मंत्रीपुत्राचा प्रतीकात्मक पुतळा दहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर संघटक मतीन सय्यद यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले

यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर संघटक मतीन सय्यद समवेत राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश महासचिव अथर खान, विशाल बेलपवार, वसीम शेख, दिपक लिपाने,

आसिफ शेख, कलीम शेख, सलमान शेख, अन्सार सय्यद, जावेद शेख आदी उपस्थित होते मतीन सय्यद म्हणाले की उत्तर प्रदेश मध्ये लखीमपुर येथे झालेल्या हिंसाचाराच्या घटनेने लोकशाहीचे चार स्तंभ ढासळलेला आहे व भाजप सरकार हे शेतकऱ्यांना देशोधडीला प्रयत्न आहे

व शांततेत शेतकऱ्यांचा मोर्चा पुढे जात असताना मागून त्यांच्या अंगावर गाड्या घालून शेतकऱ्यांना अमानुषपणे चिरडणयात आले या घटनेचा देशभरात निषेध व्यक्त होत

असून या घटनेची चौकशी करून दोषींना लवकरात लवकर कठोर शिक्षा देण्याची मागणी देखील करण्यात आली आहे तसेच मंत्रीपुत्राला जबाबदार धरून मंत्री मिश्रा यांना तत्काळ राजीनामा घेऊन कारवाई करण्यात यावी.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe