कंटेनरच्या चाकाखाली सापडून दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या एकाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास तालुक्यातील बोटा परिसरातील माळवाडी येथे घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील भिमा मधे (रा. खांडगेदरा, ता. संगमनेर ) हा युबक या अपघातामध्ये जागीच ठार झाला.

मंगळवारी सायंकाळी सुनील मधे आणि त्याचा जोडीदार तेजस गणेश मधे आणि दोन वर्षाची मुलगी प्रीती तेजस मधे हे तिघेजण मोटरसायकल वरून घारगाव कडून आळेफाट्याच्या दिशेने चालले होते. ‘
पाऊस चालू असल्याने त्यांची मोटरसायकल रस्त्यावरून घसरली. मोटरसायकल वरील तिघे जण रस्त्यावर पडले. यावेळी पाठीमागून (एमएच 20 इजी 3726) क्रमांकाचा कंटेनर येत होता.
कंटेनर वरील चालकाने सुरक्षित अंतर न ठेवल्याने कंटेनर खाली सापडून सुनील मधे या युवकाचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच घारगाव पोलीस आणि ‘डोळासने महामार्ग केंद्राचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
अपघातातील जखमींना उपचारासाठी येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून कंटेनर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
घारगाव पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला असून ते पुढील तपास करीत आहे.












