Ahilyanagar News:- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजून देखील पक्षांकडून उमेदवारांच्या पूर्ण याद्या जाहीर न केल्यामुळे अनेक मतदारसंघांमध्ये इच्छुकांची मात्र मोठ्या धाकधूक वाढल्याचे चित्र असून असेच काहीशी परिस्थिती अहिल्या नगर जिल्ह्यातील अनेक विधानसभा मतदारसंघांमध्ये दिसून येत आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर या ठिकाणी काँग्रेसचे विद्यमान आमदार लहू कानडे यांना उमेदवारी निश्चित मानली जात होती व तसे संकेत देखील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून देण्यात आले होते.
परंतु या ठिकाणहून ससाने गटाचे हेमंत ओगले यांनी देखील काँग्रेसच्या माध्यमातून उमेदवारीसाठी प्रयत्न चालवले होते व त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून काँग्रेसने आज जाहीर केलेल्या 23 उमेदवारांच्या यादीमध्ये श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातून हेमंत ओगले यांना काँग्रेसची उमेदवारी देण्यात आलेली आहे.
काँग्रेसने जाहीर केली 23 उमेदवारांची यादी
1- भुसावळ– राजेश मानवतकर
2- जळगाव जामोद-डॉ. श्रीमती स्वाती वाकेकर
3- अकोट– महेश गंगाने
4- वर्धा– शेखर शेंडे
5- सावनेर– श्रीमती अनुजा केदार
6- नागपूर दक्षिण – गिरीश पांडव
7- कामठी – सुरेश भोईर
8- भंडारा– श्रीमती पूजा ठावकर
9- अंजनी मोरगाव– दिलीप बनसोड
10- आमगाव– राजकुमार पुरम
11- राळेगाव– प्रो. वसंत पुरके
12- यवतमाळ– अनिल बाळासाहेब शंकरराव मांगुळकर
13- आर्णी– जितेंद्र शिवाजीराव मोघे
14- उमरखेड– साहेबराव दत्तराव कांबळे
15- जालना– कैलास गोरंट्याल
16- औरंगाबाद ईस्ट– मधुकर देशमुख
17- वसई– विजय गोविंद पाटील
18- कांदिवली पूर्व –काळू बढेलिया
19- चारकोप– यशवंत जयप्रकाश सिंग
20- सायन कोळीवाडा – गणेश कुमार यादव
21- श्रीरामपूर – हेमंत ओगले
22- निलंगा– अभय कुमार सतीश राव साळुंखे
23- शिरोळ– गणपतराव आप्पासाहेब पाटील