अजित पवारांचे श्रीरामपूरकरांना मोठे आश्वासन! पुढील काळात श्रीरामपूरच्या विकासासाठी देणार 3000 कोटींचा निधी, आणि पाण्याचा प्रश्न सोडवू इत्यादी….

आमचे उमेदवार लहू कानडे यांच्या माध्यमातून श्रीरामपूर साठी पुढील काळात 3 हजार कोटी रुपयांचा निधी देऊ तसेच एमआयडीसीत उद्योग आणू आणि पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवू अशा प्रकारची ग्वाही त्यांनी या माध्यमातून श्रीरामपूरकरांना दिल्या.

Ajay Patil
Published:
ajit pawar

Ahilyanagar News:- श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेसचे विद्यमान आमदार लहू कानडे यांचे काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून तिकीट कापल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून उमेदवारी मिळवली व त्यांच्या समोर काँग्रेस पक्षाकडून हेमंत ओगले यांचे आवाहन असून या ठिकाणची निवडणूक ही रंगतदार होण्याची चिन्हे दिसून येत आहेत.

लहू कानडे यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच प्रचार सभा घेतली व यामध्ये श्रीरामपूरकरांना विविध आश्वासने दिली. या प्रचार सभेमध्ये त्यांनी म्हटले की आमचे उमेदवार लहू कानडे यांच्या माध्यमातून श्रीरामपूर साठी पुढील काळात 3 हजार कोटी रुपयांचा निधी देऊ तसेच एमआयडीसीत उद्योग आणू

आणि पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवू अशा प्रकारची ग्वाही त्यांनी या माध्यमातून श्रीरामपूरकरांना दिल्या. श्रीरामपूर येथील थत्ते मैदानावर कानडे यांच्या प्रचारार्थ प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते व त्यावेळी मुख्यमंत्री अजित दादा बोलत होते.

श्रीरामपूरच्या विकासासाठी देणार तीन हजार कोटींचा निधी- उपमुख्यमंत्री अजित पवार
आमचे उमेदवार लहू कानडे यांच्या माध्यमातून येणाऱ्या काळात श्रीरामपूरकरिता 3000 कोटी रुपयांचा निधी देऊ तसेच एमआयडीसीमध्ये उद्योग आणू व पाण्याचा प्रश्न देखील सोडवू अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लहू कानडे यांच्या प्रचारार्थ आयोजित प्रचार सभेमध्ये बोलताना दिली. यावेळी राष्ट्रवादीचे नेते अविनाश आदिक तसेच भाजपचे तालुकाध्यक्ष दीपक पठारे, अनुराधा आदिक,

सत्यजित कदम व अरुण नाईक, इंद्रनाथ थोरात इत्यादी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी अजित पवार म्हणाले की,मतदारसंघांमध्ये अजोळचे देवळाली प्रवरा समाविष्ट आहे. त्यामुळे येथे एक भावनिक नाते जोडलेले असून लहानपणी श्रीरामपूरला चित्रपट पाहायला यायचो व येथील आर्थिक सुबत्ता तेव्हा अनुभवली आहे व ते गतवैभव श्रीरामपूरला पुन्हा आणू असे देखील त्यांनी म्हटले.

कांबळे हे कोणत्याही पक्षाचे अधिकृत उमेदवार नाहीत- उपमुख्यमंत्री अजित पवार
श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचे शिंदेसेनेकडून भाऊसाहेब कांबळे हे रिंगणात आहेत. त्यामुळे महायुती समोर या ठिकाणी मोठा पेच निर्माण झाल्याचे चित्र आहे. याविषयी बोलताना अजित पवार म्हणाले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची श्रीरामपूर मध्ये सोमवारी सभा होणार होती.

पण ती सभा मीच रद्द केली व त्याच सभा मंडपामध्ये माझी सभा आता होत आहे. यावरून तुम्ही समजून घ्या की भाऊसाहेब कांबळे हे कोणत्याही पक्षाचे अधिकृत उमेदवार नाहीत. त्यांना अर्ज मागे घेण्यासाठीचा आदेश देण्यात आलेला होता.

परंतु ते नॉट रिचेबल झाले व आता ते आजारी पडल्याचे ढोंग करत आहेत. लहू कानडे यांना उमेदवारी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर झाला असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe