शेअर मार्केट फसवणूक प्रकरणात मानसिक त्रास! शेवगाव तालुक्यातील घोटण येथील तरुणाचा पोलीस ठाण्यातच पेटवून घेण्याचा प्रयत्न

शेवगाव तालुक्यातील घोटण येथील तरुणाने ज्वलनशील पदार्थ अंगावर टाकत पोलीस ठाण्यामध्ये स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली.

Ajay Patil
Published:
ahilyanagar crime news

Ahilyanagar News: शेअर मार्केट मधील गुंतवणुकीतून दुप्पट परताव्याच्या आमिषाने होणाऱ्या फसवणुकीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसून येत असून असे अनेक प्रकार सध्या समोर येत आहेत व अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील अशा प्रकरणांमध्ये मागील काही दिवसांपासून प्रचंड प्रमाणात वाढ झाल्याची परिस्थिती आहे.

कित्येक लोकांनी आपला कष्टाचा पैसा शेअर मार्केटमध्ये एखाद्या व्यक्तीचा सांगण्यावरून गुंतवला व समोरच्या व्यक्तीने आर्थिक फसवणूक करून पोबारा केल्याच्या घटना सातत्याने घडत असल्यामुळे अनेक जणांना खूप मोठ्या प्रमाणावर मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

अगदी याच पद्धतीच्या घटना शेवगाव तालुक्यातून समोर आली आहे. या ठिकाणी शेअर मार्केटमध्ये फसवणूक झाल्यामुळे शेवगाव तालुक्यातील घोटण येथील तरुणाने ज्वलनशील पदार्थ अंगावर टाकत पोलीस ठाण्यामध्ये स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. परंतु वेळीच हा प्रकार पोलिसांच्या लक्षात आल्यामुळे पुढील होणारा अनर्थ टळला.

 शेवगाव तालुक्यातील तरुणाचा पोलीस ठाण्यातच पेटवून घेण्याचा प्रयत्न

शेवगाव शेअर मार्केटमध्ये फसवणूक झाल्याने अनेकजण हतबल झालेले आहेत. त्या प्रकारातून घोटण (ता. शेवगाव) येथील युवकाने ज्वलनशील पदार्थ अंगावर ओतून घेत पोलिस ठाण्यात स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. ही घटना शुक्रवारी (दि. १०) दुपारी दोनच्या सुमारास घडली.

वेळीच तिथे उपस्थित असलेल्या पोलिसांना सदर प्रकार दिसताच त्यांनी त्या युवकाला रोखल्याने मोठा अनर्थ टळला. युवकाची एका शेअर मार्केट ट्रेडिंग करणाऱ्याने एजंट कडून फसवणूक झाली आहे.

सदर युवकाने जमा केलेल्या रकमेच्या बदल्यात त्या एजंटने ट्रॅक्टर दिला होता. दरम्यान एजंटचा भाऊ सदर ट्रॅक्टर पुन्हा घेऊन गेला. संबंधित एजंट विरोधात शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्यास शेवगाव पोलिसांनी यापूर्वीच गजाआड केले आहे.

ट्रॅक्टर ओढून घेऊन गेल्याच्या रागातून संबंधित युवकाने सदर कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितले. शेअर मार्केट फसवणूक घटनांमध्ये वाढ होत असताना दुसरीकडे पैशांच्या देवाणघेवाणीमुळे वाद विवाद, धमकावणे आदी घटना वाढल्या आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe