अहमदनगर Live24 टीम, 07 फेब्रुवारी 2021:- शेवगाव नगरपरिषदेतील नगराध्यक्ष, नगरसेवक यांचा पाच वर्षाचा कार्यकाळ रविवार ( दि.७ ) रोजी संपुष्टात आला आहे.
यामुळे पुढील नवनिर्वाचित सदस्यांची पहिली बैठक होइपर्यंत प्रशासक म्हणून उपविभागीय अधिकारी देवदत्त केकाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

file photo
दरम्यान एप्रिल अथवा मे महिन्यामध्ये सार्वत्रिक निवडणूक जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. निवडणूक पूर्व प्रशासकीय पातळीवरील तयारीला वेग आला आहे. प्रभाग रचना,
आरक्षण जाहीर झाल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ८ मार्च रोजी मतदान केंद्र निहाय मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. दरम्यान नगराध्यक्ष निवडीपर्यंत प्रांताधिकारी देवदत्त केकाण हे प्रशासक म्हणून कारभार पाहणार आहेत.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved