Ahilyanagar News:- अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव विधानसभा मतदारसंघ हा अनेक दृष्टीकोनातून खूप महत्त्वाचा मतदारसंघ असून या ठिकाणी विद्यमान आमदार अशुतोष काळे हे पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात असून त्यांनी प्रचारात सध्या मोठ्या प्रमाणावर वेग घेतला असून अनेक ठिकाणी त्यांनी शहरांमध्ये कॉर्नर सभांचे आयोजन करून मतदारांच्या गाठीभेटी व संवाद साधण्यावर भर दिला आहे.
प्रचाराचा भाग म्हणून काल कोपरगाव शहरातील संजय नगर येथे कॉर्नर सभा घेतली व यावेळी त्यांनी कोपरगाव शहराच्या भविष्यकाळासाठी आपण काय काम करणार आहेत याची एक रूपरेषा सांगितली. यामध्ये बेरोजगारी हटवण्यासोबतच कोपरगाव शहराचा आणि मतदारसंघाचा विकास आणि बेरोजगारी इत्यादी मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केले.
एमआयडीसीतून बेरोजगारी हटवणार- आमदार आशुतोष काळे
कोपरगाव शहरातील संजय नगर येथे आशुतोष काळे यांनी कॉर्नर सभेचे आयोजन केले होते व त्यावेळी त्यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले व त्यावेळी बोलताना त्यांनी म्हटले की,
सोनेवाडी व सावळी विहीर गावच्या सीमेवर एमआयडीसीला मंजुरी मिळून भूमिपूजन देखील झाले असून एमआयडीसीच्या माध्यमातून मतदार संघातील हजारो बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध होऊन त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
इतकेच नाहीतर कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या विकासात युवकांच्या हिताला प्राधान्य देऊन त्यांचे उज्वल भविष्य घडवायचे आहे. त्यामुळे यापुढील काळात बेरोजगार तरुणांच्या हाताला रोजगार उपलब्ध होऊन त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
इतकेच नाहीतर कोपरगाव शहरालगत असलेल्या औद्योगिक वसाहती मधील एकूण 173.34 हेक्टर म्हणजे 433 एकर उपलब्ध असलेली जागा एमआयडीसी कडे वर्ग करण्याबाबत सविस्तर चर्चा होऊन पालकमंत्री व उद्योग मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद याबाबत दिला असून त्या ठिकाणी एमआयडीसी उभारण्याचा मनोदय आहे. या एमआयडीसीमध्ये विविध प्रकारचे व्यवसाय उपलब्ध होतील व त्यातून शेतकरी तसेच शेतमजूर, कामगार तसेच महिला यांना देखील यातून मोठ्या प्रमाणामध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध होणार असल्याचे देखील त्यांनी म्हटले.
तसेच कोपरगाव मतदार संघामध्ये रस्त्यांची निर्मिती तसेच पाणी व आरोग्याचे प्रश्न सोडवून नागरिकांच्या अडचणी दूर करून मूलभूत सुविधा देणे हे तर माझे कर्तव्य आहे असे देखील त्यांनी म्हटले. तसेच तालुक्यातील बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे ही आमदार म्हणून माझी जबाबदारी असल्याचे देखील त्यांनी म्हटले.
स्थानिकांना रोजगार मिळेल याबाबत त्यांनी निश्चिंत रहावे व भविष्यात इतर विकसित शहराच्या बरोबरीत कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचा विकास करण्याचे माझे स्वप्न आहे व त्यासाठी मतदारसंघातील जनतेची साथ आणि आशीर्वाद अत्यंत महत्त्वाचे असून येणाऱ्या वीस तारखेला होणाऱ्या निवडणुकीत जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यावे असे आवाहन देखील त्यांनी या कॉर्नर सभेत दरम्यान बोलताना मतदारांना केले.