Ahilyanagar News: राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचा ज्वर चढला असून प्रत्येक पक्षाकडून मोठ्या प्रमाणावर आता या निवडणुकीच्या निमित्ताने तयारी करण्यात येत आहे. जो तो आपापल्या पद्धतीने प्रयत्नांची पराकाष्टा करून विधानसभा निवडणुकीचे घोडे मैदान मारण्याच्या दृष्टिकोनातून अनेक प्रकारच्या रणनीती अवलंबत आहेत.
त्यातल्या त्यात राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघांमध्ये इच्छुकांची गर्दी वाढल्याने नेमकी उमेदवारी कोणाला द्यावी? हा सगळ्यात मोठा प्रश्न महायुती आणि महाविकास आघाडी समोर सध्या आहे. त्यामुळे बंडखोरी होऊ नये याकरिता प्रत्येक पक्षाकडून काळजी देखील घेतली जात आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होण्याची शक्यता असल्याने नेमकी उमेदवारी कोणाला मिळणार? हा मोठा प्रश्न आता इच्छुक उमेदवार आणि प्रत्येक मतदारसंघातील मतदारांपुढे आहे. अगदी अशीच काहीशी परिस्थिती अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघांमध्ये दिसून येत आहे.
निवडणूक आयोगाकडून आचारसंहितेची कोणत्या क्षणी घोषणा होण्याची शक्यता आहे. परंतु अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघांमध्ये मात्र कुठल्याही पक्षाकडून कोणालाही उमेदवारी मात्र अजून पर्यंत जाहीर करण्यात आलेली नाही.
त्यामुळे अगोदर पासून अनेक इच्छुक या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेले होते. परंतु ऐनवेळी उमेदवारी नेमकी कोणाला जाहीर होते याची कुठल्याही प्रकारची शाश्वती नसल्यामुळे इच्छुकांचा जीव मात्र आता टांगणीला लागल्याचे चित्र आहे.
कोणत्याही क्षणी लागू शकते आचारसंहिता, परंतु अहिल्यानगर जिल्ह्यात आतापर्यंत कोणालाच उमेदवारी जाहीर नाही
पितृपक्ष संपला, दसराही झाला. आयोगाकडून आचारसंहितेची कोणत्याही क्षणी घोषणा होऊ शकते. उमेदवारी मात्र अजून कुणालाच जाहीर झालेली नाही. इच्छुकांनी तयारी केली; पण ऐनवेळी उमेदवारी कोणाला जाहीर होते, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
इच्छुकांचाही जीव टांगणीला लागला आहे.विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर मोठे कार्यक्रम घेता येणार नाहीत म्हणून जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांनी नवरात्रोत्सवात विविध कार्यक्रम घेत मतांची पेरणी केली. कार्यक्रमांसोबतच जेवणावळी सुरू होत्या.
विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून उमेदवार चर्चेत आले. इच्छुकांनीही खर्चासाठी हात ढिला सोडला; पण उमेदवारीचे काय?, हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे. तयारीला लागण्याचे आदेश एकाच पक्षातील अनेकांना होते. त्यामुळे तयारी केली. पण उमेदवारीसाठी विलंब होत असल्याने सर्वांचीच चिंता वाढली आहे.
विद्यमान आमदारांना पुन्हा उमेदवारी मिळणार, हे जवळपास निश्चित आहे. त्यामुळे त्यांनी प्रचारात सुरुवातीपासूनच आघाडी घेतलेली आहे; परंतु समोर कोण उमेदवार असेल?, याचे कोडे अनेकांना अजून तरी उलगडलेले नाही. त्यामुळे निवडणुकीची रणनीती आखणार तरी कशी?, असा प्रश्न इच्छुकांसमोर आहे.