चालकाकडून प्रवासी महिलेवर अत्याचार !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,17 ऑगस्ट 2020 :- प्रवासी महिलेला पिकअपमधून नेताना चालकाने तिच्यावर अत्याचार केले. स्थानिक गुन्हे शाखा व घारगाव पोलिसांनी संयुक्त कारवाई करत आरोपीला १२ तासांच्या आत गजाआड केले.

सुखदेव बबन कंकराळे (३०, कोर्ट परिसर, बारगाव पिंपरी रोड, सिन्नर, जि. नाशिक) असे आरोपीचे नाव आहे. संगमनेर बायपास पुणे-नाशिक महामार्गावरुन चाकणला जाण्यासाठी उभी असलेली महिला एका पिकअपमध्ये बसली.

नारायणगाव तालुक्यातील जुन्नर भाजी मार्केट परिसरात पिकअप नेऊन चालकाने महिलेला मारहाण करुन बळजबरीने दारु पाजून तिच्यावर अत्याचार केले.

नंतर तिला आळेफाटा येथे सोडले. पीडित महिलेने १४ ऑगस्टला घारगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी महिलेकडून आरोपीचे वर्णन व गुन्ह्यात

वापरलेल्या पिकअपची माहिती घेतली. पोलिसांनी आरोपीला १२ तासांत जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथे ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment