अहमदनगर Live24 टीम,28 ऑक्टोबर 2020 :- डॉ. तनपुरे कारखान्याच्या 60 व्या गळीत हंगामाच्या व बॉयलर अग्निप्रदीपन शुभारंभ नुकताच खा. डॉ. सुजय विखे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी त्यांनी आपल्या नेहमीच्या शैलीमध्ये विरोधकांचा समाचार घेत शेतकरी व कामगार यांना आश्वासित केले.
यावेळी बोलताना खा. विखे म्हणाले, आधुनिक मशिनरी बसविल्याने आता या कारखान्याची क्षमता 2800 टनावरून 4500 टनावर जाणार असून दीड महिन्यातच डिस्टीलरी प्रकल्प सुरू करून 40 हजार लिटर क्षमतेने चालविणार आहे.

या गळिताला 6 लाख टन गाळप होणार असून जिल्ह्यात उसाला उच्चांकी भाव देणार आहे. डॉ.तनपुरे कारखान्याला नवसंज़ीवनी दिली. यात माजीमंत्री शिवाजीराव कर्डिलेंचे मोठे योगदान आहे. ज्यांनी बिनबुडाचे आरोप केले,
त्यांनी या कारखान्याला एक टिपरूही घातलेले नाही वरून त्यांच्याकडे कारखान्याचा अॅडव्हॉन्स असल्याचे दिसते. या कारखान्यात एक रुपयाचाही भ्रष्टाचार सिद्ध करून दाखविला तर खासदारकीचा राजीनामा देणार असल्याची
स्पष्टोक्ती देताना पुढच्या निवडणुकीत येऊन पहा असे खुले आव्हान खा. डॉ. सुजय विखे यांनी आरोपकर्त्यांना दिले. कामगारांच्या पगारातील एक रुपयाही ठेवणार नसल्याचे आश्वासन त्यांनी दिले. खा. डॉ. विखे यांनी प्रतिष्ठा पणाला लावल्याने जिल्हा बँकेने कारखान्याला भरीव मदत केली.
जिल्ह्यातील सर्वच कारखान्यांचे गाळप सुरू झाले असून जिल्हा बँकेने 332 कोटी रुपयांची मदत कारखान्यांना केली आहे. इथेनॉलचा प्रस्ताव कारखान्यांनी तयार केला तर जिल्हा बँक मदत करणार असल्याचे आश्वासन माजी आ. कर्डिले यांनी दिले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved













