अहमदनगर Live24 टीम, 30 डिसेंबर 2020 :-राज्य निवडणूक आयोगाने 14 हजार 234 ग्रामपंचायतींसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. 15 जानेवारीला प्रत्यक्ष मतदान होणार आहे.
त्यासाठी 23 डिसेंबरपासून अर्ज भरण्यास सुरुवात झालीअसून आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. यातच अनेक ठिकाणच्या ग्रामपंचायत निवडणुका या बिनविरोधाकडे वाटचाल करीत आहे,
तर काही ठिकाणच्या निवडणूक या बिनविरोध देखील झाल्या आहेत. यातच एक महत्वाची माहिती समोर येत आहे. आमदार रोहित पवार यांचा बालेकिल्ला असलेला जामखेड तालुक्यात भाजपने आपले कमळ फुलवले आहे.
जामखेड तालुक्यातील सारोळा व आपटी या दोन ग्रामपंचायतसाठी जागेच्या प्रमाणातच उमेदवारी अर्ज दाखल झाले त्यामुळे दोन्ही ग्रामपंचायत बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे
या दोन्ही ग्रामपंचायतवर भाजपचे वर्चस्व होते व पुन्हा झाले आहे. आपटी ग्रामपंचायत बिनविरोध होण्याची सहावी वेळ आहे तर सारोळा ग्रामपंचायत दुसर्या वेळेस बिनविरोध होत आहे.
माजी मंत्री राम शिंदे यांच्या ताब्यात ग्रामपंचायत आल्याने भाजपला नवसंजीवनी मिळाली आहे. तर खुरदैठन ग्रामपंचायत प्रथमच बिनविरोध होऊन ती राष्ट्रवादीकडे गेली आहे.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved