ब्रेकिंग न्यूज ! हिवरे बाजार ग्रामपंचायतीत पोपटराव पवारांची सत्ता कायम

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :-राज्यातील अनेक ग्रामपंचायतीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान पार पडले होते. दरम्यान आज 18 जानेवारी रोजी याचा निकाल जाहीर होणार आहे.

यातच नगर जिल्ह्यातील सर्वांचे लक्ष लागून राहिलेली हिवरेबाजार येथील निवडणुकीचे कल हाती आले आहे. नगर जिल्ह्यातील ‘आदर्श गाव हिवरेबाजार’ येथे 30 वर्षांनी बिनविरोध निवडणुकीची परंपरा प्रथमच खंडित झाली होती.

या हिवरेबाजार ग्रामपंचायत निकालाचा सध्या हाती आलेल्या आकडेवारीनूसार पद्मश्री पोपटराव पवार यांच्या पॅनलचा सातही जागांवर विजय झाला आहे.

हिवरेबाजार ग्रामपंचायतीत पोपटराव पवार यांची एकहाती सत्ता आली आहे. दरम्यान 15 जानेवारी रोजी मतदारांनी उत्स्फूर्त पणे मतदानासाठी सकाळपासूनच रांगा लावल्या होत्या.

यावेळी निवडणूक बिनविरोध होऊ शकली नसली, तरी निवडणूक कशी असावी, याचाही आदर्श घालून देण्याचा आम्ही प्रयत्न करीत असल्याचे पोपटराव पवार यांनी सांगितले होते.

गावातील किशोर संबळे यांनी पुढाकार घेऊन पोपटराव पवार यांच्याविरोधात पॅनल उभा केल्याने येथील निवडणूक बिनविरोध होऊ शकली नाही. त्यामुळे यावेळी मतदान झाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment