बिनविरोध परंपरा खंडित… उमेदवारांना मिळू लागल्या धमक्या

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 5 जानेवारी 2021 :- यंदाच्या ग्रामपंचायत निवडणूका चांगल्याच चर्चेच्या ठरू लागल्या आहेत. बिनविरोधची परंपरा असलेल्या अनेक गावांची परंपरा यंदा खंडित झाली असून दिगज्जांची सत्ता असलेल्या पुढाऱ्यांना देखील निवडणुकीचा सामना करावा लागतो आहे.

दरम्यान यामुळे परस्पर वैमनस्य वाढू लागले असल्याचे दिसून येत आहे. पद्मश्री पोपटराव पवार यांचं नगर तालुक्यातील आदर्श गांव हिवरे बाजार ग्रामपंचायतीत ३० वर्षानंतर निवडणुक होणार असल्याचे आज स्पष्ट झाले आहे.

गावातील काही मंडळींनी एकत्र येऊन परिवर्तन ग्रामविकास पॅनल निवडणुकीत उतरवले आहे. दरम्यान आज अर्ज माघारी घेण्याची मुदत संपल्यानंतर परिवर्तनाच्या उमेदवारांनी पोलिस अधीक्षक कार्यालयात जाऊन निवडणूक प्रचारा दरम्यान जिवितास धोका असल्याने पोलिस संरक्षण मिळण्याची मागणी केली.

बिनविरोध निवडणुकीस प्रतिसाद न दिल्याने सत्ताधा-यांकडुन दहशत होत असल्याचा आरोप परिवर्तनाच्या उमेदवारांनी केला आहे.

सन १९८५ मधे या आधी निवडणुक झाली होती तर १९८९ नंतर आत्तापर्यंत सलग सहा वेळा ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे आता ३० वर्षाने ग्रामस्थांना मतदान करावे लागणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment