नागरिकांचा बेजाबदारपणा भरतोय प्रशासनाची तिजोरी; महसुलात लाखोंची भर

अहमदनगर Live24 टीम, 8 जून 2021 :-श्रीगोंदा तालुक्यात विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करत तब्बल 3914 केसेस दाखल करून तब्बल 16 लाख 65 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.

याबाबतची माहिती श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पो. नि. रामराव ढिकले यांनी दिली. अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी लॉकडाऊन जाहीर करत विनामास्क व विनाकारण फिरणाऱ्या व्यक्तींवर गुन्हे दाखल करून प्रत्येकी ५००/- रुपये दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनीही सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी आणि पोलीस निरीक्षक यांना या आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यामुळे कोरोनाचा प्रसार वाढु नये म्हणुन १९ फेब्रुवारी २०२१ ते ०८ जून २०२१ या चार महिन्याच्या कालावधीत श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे अधिकारी,

कर्मचारी यांनी नाकेबंदी, पेट्रोलिंग करुन श्रीगोंदा शहर व पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मास्क न लावता फिरणारे , सार्वजनिक ठिकाणी विनाकारण फिरणारे व सोशल डिस्टसिंगचे पालन न करणा-या व्यक्तींवर ३९१४ केसेस दाखल करून १६६५१००/- रु. दंड वसूल केला आहे.