मंत्र्याच्या घरात कोरोनाचा शिरकाव !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम ,8 जुलै 2020 :संगमनेर हा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा मतदार संघ. या ठिकाणी होत असलेल्या कोरोना विस्फोटाविरुद्ध ते लढा देत असतानाच राज्यातील परिस्थितीवरही त्यांचे लक्ष आहे.

परंतु आता त्यांच्याच मुंबईतील बंगल्यात कोरोना पोहोचल्याने खळबळ उडाली आहे. त्यांच्या सरकारी निवासस्थानी काम करणाऱ्या टेलिफोन ऑपरेटरला कोरोनाची लागण झाली आहे.

त्यामुळे बंगल्यावरील अन्य कर्मचारी आणि संपर्कात आलेल्या अन्य वीस जणांचे अहवाल तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. थोरात सध्या मुंबईतच आहेत. दक्षता म्हणून त्यांनी स्वत:ला तेथेच विलग केले आहे.

संगमनेरमध्ये सुरुवातीच्या टप्प्यातच रुग्ण आढळून आले होते. तेव्हापासून थोरात यंत्रणेच्या संपर्कात राहून काम करीत आहेत. आतापर्यंत संगमनेरमध्ये १५४ कोरोना बाधित आढळून आले आहेत तर १२ जणांचा मृत्यू झाला आहे.

नगर जिल्ह्यात आतार्पंत १७ जणांचा करोनामुळे मत्यू झाला असून त्यात सर्वाधिक बारा मृत्यू एकट्या संगमनेर तालुक्यातील आहेत.

गुरुवारी नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ संगमनेरला येऊन आढावा बैठक घेणार आहेत. परंतु त्याआधीच महसूल मंत्र्यांच्या बंगल्यापर्यंत कोरोना पोहोचल्याने खळबळ उडाली आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment