अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :- जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमणाचे प्रमाण वाढत चालले आहे. ग्रामीण भागातही हा आजार फोफावत चालला आहे.
राहाता तालुकाही यल अपवाद राहिलेला नाही. परंतु तालुक्यात सर्वत्र करोनाचे रुग्ण सापडत असताना मोठी बाजारपेठ असलेले सावळीविहीर गाव त्याला अपवाद ठरले होते.
मात्र काल दुपारी नगर-मनमाड रोड लगत सोमैयानगरमध्ये एका 42 वर्षीय महिलेला करोनाची लागण झाली असल्याचे निदर्शनास आल्याने
मात्र परिसरात खळबळ उडाली. प्रशासनाने हा संपूर्ण भाग सील केला असून महिलेच्या संपर्कात आलेल्या आठ जणांना क्वॉरंटाईन केले आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews