अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :-राहुरी तालुक्यातील वरवंडी येथील रोहित कचरू लांडगे या २४ वर्षांच्या तरूणाने १५ एप्रिलला गळफास घेऊन आत्महत्या केली.
या प्रकरणी राहुरी पोलिसांनी सहा जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. मृताची आई शिवबाई कचरू लांडगे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे,
माझा मुलगा रोहित याची सासू बिटूबाई व पत्नी शिवानी हे वारंवार त्याला शिवीगाळ, दमदाटी करुन मानसिक त्रास देत होते.
१५ एप्रिलला रोहितने त्याची बहीण रेखा हिला फोन करून सांगितले की, शिवानीला घेऊन जाण्यासाठी तिची आई बिटूबाई मारुती शिनगारे व इतर काहीजण (डिग्रस) हे घरी आले होते.
पत्नी शिवानी हिला घेऊन जाण्यास नकार दिल्याने रोहितला मारहाण केली. पत्नी, सासू व इतर काहीजणांच्या त्रासाला कंटाळून रोहितने आत्महत्या केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल केला.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|