लाखो भाविकांचे कुलदैवत ‘हे’ देवस्थान भाविकांना दर्शनासाठी खुले!

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 04 फेब्रुवारी 2021:-जिल्ह्यासह राज्यातील लाखो भाविकांचे कुलदैवत श्रध्दास्थान असलेल्या पारनेर तालुक्यातील पिंपळगाव रोठा येथिल श्री क्षेत्र कोरठण खंडोबा हे राज्यस्तरीय ब वर्ग तीर्थक्षेत्र असलेले देवस्थान यात्राकाळात सर्वसामान्य भाविकांना दर्शनासाठी बंद होते.

यात्रा संपल्यानंतर दि.३१ जानेवारी पासून  कोरठण खंडोबा मंदिर सर्वाना दर्शनासाठी पुन्हा दर्शन घेण्यासाठी खुले झाले आहे. दर्शनाला जाताना मास्क लावणे, हात स्वच्छ करणे व सुरक्षित अंतर पाळणे बंधनकारक आहे.

मंदिर दर्शन वेळ सकाळी ८ ते सायंकाळी ७ पर्यंत आहे. कुलधर्म कुलाचार म्हणून जागरण व गोंधळ विधी कार्यक्रम अल्पदरात करण्याची सुविधा देवस्थानतर्फे सुरू आहे आहेत.

कोरोना व लॉकडाऊन काळात मंदिर ८ महिने बंद राहिले, आणि यात्रा उत्सव ही रद्द होऊन मंदिर बंद ठेवावे लागल्याने, वर्षभरात देवस्थानला उत्पन्नच मिळाले नाही.

त्यामुळे मंदिर परिसर व विकास कामांना पुन्हा गती देण्यासाठी आता दर्शनाला येणऱ्या भाविक भक्तांनी यथा शक्ति रोख, चेक अथवा ऑनलाइन देणगी देऊन देवस्थानला मदत करावी. असे आवाहन देवस्थान तर्फे विश्वस्त मंडळाने केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!