अहमदनगर Live24 ,19 जून 2020 : गावचा विकास करण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करून जास्तीत – जास्त निधी उपलब्ध करून दिला आहे. मात्र गावात होणारी कामे ही दर्जेदार व्हावीत, तसेच विकासकामात कोणत्याही प्रकारची तडजोड करू नका, असे आमदार बबनराव पाचपुते म्हणाले.
श्रीगोंदा येथील एक कामाचे भूमीपूजन प्रसंगी ते बोलत होते. आमदार पाचपुते म्हणाले, गावातील विकास कामासाठी निधीची कमतरता नाही पण चालू केलेली कामे उत्कृष्ट व दर्जेदार असावी.
गावातील रस्ता हा मुख्य बाजारपेठेचा आहे. सुरुवातीचे काम निकृष्ट झाले पण आता काम करताना ग्रामपंचायतीने दखल घ्यावी. रस्त्यावर अतिक्रमण असेल तर ते काढून काम करावे.
निधी पुन्हा येत नाही. भगवानराव पाचपुते म्हणाले, गावात चांगली कामे चालू आहे परंतु काही विघ्नसंतोषी लोक गावाला वेठीस धरून विकास कामात अडथळा आणत आहे. अशा चुकीच्या गोष्टीचा बंदोबस्त करावा लागेल.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews