अहमदनगर Live24 टीम,15 सप्टेंबर 2020 :- कोरोनाच्या संकटामुळे विद्यार्थ्यांचे शाळा कॉलेज अद्यापही सुरु करण्यात आले नाही. शासनाने यावर उपाय म्हणून ऑनलाईन शिक्षण सुरु केले. मात्र इंटरनेट विना विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळा निर्माण झाला आहे.
आदिवासी भागातील अकोले तालुक्यातील मुथाळने या गावात इंटरनेटच नव्हे तर मोबाईलची सेवा मिळत नाही. अशीच परिस्थिती संगमनेर तालुक्यातील दहा गावांमध्ये आहे.
आदिवासी भागातील अकोले तालुक्यातील मुथाळने या गावात कोणतेही दूरसंचार कंपनीचे टॉवर नाही. अशा परिस्थितीत मोबाईलला नेटवर्क नसल्याने शिक्षण कसे घ्यावे, हा विद्यार्थ्यांसमोर प्रश्न निर्माण झाला आहे.
संगमनेर तालुक्यातील पठार भागातील दहाहून अधिक गावात अद्याप मोबाईलचे नेटवर्क व्यवस्थित मिळत नाही. ग्रामस्थांना मोबाईलच्या नेटवर्कसाठी डोंगरावर अथवा दूर ठिकाणी जावून संपर्क साधावा लागतो.
अशावेळी विद्यार्थ्यांनी कसे शिक्षण घ्यायचे असा सवाल उपस्थित होत आहे. अशीच परिस्थितीती कायम राहिल्यास विद्यार्थ्यांना मोठे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मुथाळणे येथे मोबाईल नेटवर्क मिळण्यासाठी दूरंसचार कंपनीचे टॉवर उभारण्यात यावे, ही विद्यार्थी आणि पालकांनी मागणी केली आहे.
दरम्यान गावांजवळ असलेल्या मोबाईल टॉवरची क्षमता वाढवावी या मागणीसाठी ग्रामस्थांनी उपोषणी केले होते. तरीही हा प्रश्न अद्याप सुटला नाही.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights