अहमदनगर लाईव्ह 24 टीम/ अहमदनगर : जिल्हा परिषदेचे मूळ बजेट २८ कोटींचे असून, आगामी काळात त्यात वाढ करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. तसेच शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या कृषीपूरक दुग्धव्यवसायाला चालना देण्यासाठी पशुसंवर्धन विभागातील विविध योजनांसाठी अधिक तरतूद करण्याचा प्रयत्न राहिल.
असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अर्थ व पशुसंवर्धन समितीचे नवनिर्वाचित सभापती सुनील गडाख यांनी व्यक्त केले.सभापती सुनिल गडाख यांनी मंगळवारी जिल्हा परिषदेत आपल्या पदाचा पदभार स्वीकारला.
यावेळी प्रतिक्रिया देताना ते बोलत होते. याप्रसंगी शिवसेनेचे उत्तर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, जिल्हा परिषद सदस्य शरद झोडगे, नेवासा पंचायत समितीचे माजी सभापती सुनिता गडाख, राजेंद्र गुंड, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.सुनिल तुंबारे, महादेव दराडे, अहिलाजी दराडे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना सभापती गडाख म्हणाले की, जिल्ह्यातील जास्त जास्त पशुपालकांना मिल्किन मशिन वाटप करून जनावरांचे दूध काढण्याचे काम सुसह्य करण्यावर भर देण्यात येईल. पशुधन हे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा आर्थिक स्त्रोत आहे. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाकडे प्राधान्याने अधिकचे लक्ष देण्यात येईल.