माजी सैनिक जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयासमोर उपोषण करणार

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर – राहुरी तालुक्यातील निंभेरे येथील दलित कुटूंबासह माजी सैनिक सुरेश अंतु पाळंदे यांच्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत राहुरी पोलिस स्टेशनला अनुसूचित जाती-जमाती कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ होत आहे.

या अन्यायकारक घटनेच्या निषेधार्थ 11 नोव्हेंबर पासून जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयासमोर प्राणांतिक उपोषण करण्याचा इशारा सुरेश पाळंदे व भीम आर्मीचे तालुकाध्यक्ष सनी काकडे यांनी जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, राहुरी पोलिस स्टेशन येथून न्याय मिळणे अपेक्षित नसल्याने जिल्हा दक्षता समितीचे अध्यक्ष म्हणून आपल्या स्तरावरुन योग्य ती कार्यवाही करावी,

तसेच संबंधितांवर ऍट्रासिटी ऍक्टनुसार गुन्हा दाखल व्हावा, अन्यथा 11 नोव्हेंबर रोजी जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयासमोर प्राणांतिक उपोषण करण्यात येईल, असेही निवेदनात म्हटले आहे.

यावेळी जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जयकुमार पंडित, राधाकिसन पाळंदे, सतीश जाधव आदि उपस्थित होते. निवेदनावर सुरेश पाळंदे व सनी काकडे यांच्या सह्या आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe