केंद्र सरकारच्या विरुद्ध शेतकरी संघटना आक्रमक

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 07 फेब्रुवारी 2021:- दिल्ली येथे सुरू असलेले शेतकरी आंदोलन मोडून काढण्यासाठी केंद्र सरकार अमानुष दडपशाही करत असल्याच्या निषेधार्थ शनिवारी (दि. 6) देशव्यापी चक्काजाम आंदोलन पुकारण्यात आले होते.

यावेळी कॉ. संजय नांगरे म्हणाले, केंद्र सरकारने शेतकरी आंदोलन स्थळांवर प्रचंड पोलीस बळ तैनात केले आहे. आंदोलकांची रसद तोडण्यासाठी पाणी, वीज, अन्न पदार्थ यांचा पुरवठा बळाचा वापर करत तोडण्यात आला आहे.

आंदोलन स्थळावरील सत्य जगाला कळू नये, यासाठी इंटरनेट बंद करण्यात आले आहे. शेकडो शेतकर्‍यांना अटक करण्यात आली आहे. पत्रकारांवर केसेस दाखल केल्या जात आहेत.

शेतकरी नेत्यांवर खटले भरण्यात आले आहेत. आंदोलन स्थळांवर येण्यासाठी निघालेल्या शेतकर्‍यांना ठिकठिकाणी अडविण्यात येत आहे. रेल्वे नियोजित मार्गावरून इतरत्र वळविण्यात आल्या आहेत.

दरम्यान शेवगाव येथे करण्यात आलेल्या चक्काजाम आंदोलनात अखिल भारतीय किसान सभा, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष, संभाजी ब्रिगेड, प्रहार जनशक्ती मंच आदी संघटना सहभागी झाल्या होत्या.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe