अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2021 :- गेली ३० वर्षे नगर तालुक्यातील जनतेच्या अडी अडचणी सोडवण्यात, सुख दुःखात सहभागी होऊन विकासाचे प्रश्न मार्गी लावले.
तालुक्यातील घोसपुरी व बुहाणनगर पाणी योजनेच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवला. रस्त्यांचे जाळे निर्माण केले. त्यामुळे नगर तालुक्यातील जनता आजही वैयक्तीक टिकेला थारा न देता विकासालाच कौल देतात.
त्यामुळेच नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये जनतेने महाविकास आघाडीचा धुव्वा उडवित भाजपाला साथ दिली असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी केले.
नगर तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतींपैकी ४५ ग्रामपंचायतींवर भाजपाची सत्ता आली. यामध्ये बुहाणनगर, आदर्शगाव मांजरसुंबा, खोसपुरी, मांडवे, निमगाव घाणा, भोरवाडी, बाराबाभळी, सांडवे, वाटेफळ,
टाकळी काझी, बहिरवाडी, देवगाव, देहरे, पिंप्री घुमट, हातवळण, मठपिंप्री, आंबीलवाडी, उदरमल, कोल्हेवाडी, वाळुंज, पोखर्डी, गुंडेगाव, घोसपुरी, शहापुर केकती, वडारवाडी, तांदळी, दरेवाडी, वाकोडी,
रुई छत्तीसी, शिंगवे नाईक, पिंपळगाव माळवी, ससेवाडी, रतडगाव, खांडके, माथणी बाळेवाडी, पिंपळगाव वाघा, निमगाव वाघा, शिराढोण, दशमी गव्हाण, वारूळवाडी, अकोळनेर आदींचा समावेश आहे.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved